रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. आजही हीच स्थिती कायम आहे. एकीकडे मुंबईला मुसळधार पावसाने झोडपून काढले तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात मात्र आकाश निरभ्र आहे. तर कुठे ढगाळ वातावरण आहे.
रत्नागिरीच्या समुद्रकिनारी उंच लाटा; पावसाचा लपंडाव सुरुच - मिलिमीटर
समुद्रकिनारी सलग दुसऱ्या दिवशीही समुद्राला मोठे उधाण आले असून या लाटांनी रौद्र रुप धारण केले आहे. जवळपास साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. या लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यामुळे त्याचा फटका किनारपट्टीला बसत आहे.
लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत
समुद्रकिनारी मात्र सलग दुसऱ्या दिवशीही समुद्राला मोठे उधाण आले असून या लाटांनी रौद्र रुप धारण केले आहे. जवळपास साडे चार मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळत आहेत. या लाटा थेट किनाऱ्यावर धडकत आहेत. त्यामुळे त्याचा फटका किनारपट्टीला बसत आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 66 मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंडणगड आणि खेड तालुक्यांमध्ये सरासरी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पावसाने ओढ न देता बरसत राहावे अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.