महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'विरोधकांची अवस्था कावीळ झालेल्या माणसांसारखी'

कावीळ झालेल्या माणसांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते.

By

Published : May 23, 2021, 5:30 PM IST

रत्नागिरी - कावीळ झालेल्या माणसांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी केली आहे. ते रत्नागिरीत बोलत होते. तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप आज रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. यावेळी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदरात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत माणिकराव जगताप यांनी पहाणी दौरा केला.

'विरोधकांची अवस्था कावीळ झालेल्या माणसांसारखी'

या दौऱ्यात हे दोन्ही नेते मासेमारी बोटीतही उतरले आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यांशी संवाद साधताना माणिकराव जगताप यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी ही आपत्ती आहे. राज्य सरकारचे वेगवेगळे प्रतिनिधी इथं येऊन पहाणी करून, कशी मदत करायची याबाबत निर्णय घेत असतात. त्यामुळेच महाविकास अघाडीचे नेते कोकणात येतायत. सकारात्मक भूमिकेतून नुकसानग्रस्तांना मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, वैफल्यग्रस्त विरोधकांना सत्ता गेल्यानंतर प्रचंड दुःख झालं आहे. त्यामुळे कावीळ झालेल्या माणसांना जसं सगळं पिवळं दिसतं, तशी विरोधकांची अवस्था असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांनी यावेली केली आहे.

हेही वाचा -दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

ABOUT THE AUTHOR

...view details