महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-गोवा महामार्गावरील संरक्षक भिंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोसळली

मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूरमधल्या कोंढेतड येथील संरक्षक भिंत पावसाळा सुरू होण्यापूर्वीच कोसळली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

कोसळलेली संरक्षक भिंत
कोसळलेली संरक्षक भिंत

By

Published : Jun 4, 2021, 11:26 AM IST

रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामध्ये तालुक्यातील कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत यावर्षी पावसाळ्याचा प्रारंभ होण्यापूर्वी सुमारे पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्याचबरोबर परिसरातून वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली

कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होत असतानाच, मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदीरकण करणाऱ्या केसीसी बिल्डकॉन कंपनीकडून राजापूर शहरानजीक कोंढेतड-उन्हाळे हद्दीवर बांधण्यात आलेली सरंक्षण भिंत अवकाळी पावसातच कोसळली आहे. महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी घालण्यात आलेली ही भिंत सुमारे ५०० फूट दरीत कोसळली असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातून वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्याकडे ठेकेदार कंपनी व प्रशासन कानाडोळा करत असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. राजापूर शहरानजीकच्या कोंढेतड येथे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. मात्र पावसाळ्याचा शुभारंभ होण्यापूर्वीच ही भिंत लगतच्या दरीमध्ये कोसळली. त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रशचिन्ह निर्माण झाला आहे. कोसळलेल्या भिंतीमुळे त्या परिसरातून धावणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे.

हेही वाचा -विदर्भात १५ जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details