रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 12 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 851 झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेले काही दिवस आलेख चढता आहे.
दरम्यान, यामध्ये 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 851 वर पोहचली आहे. तर आज 15 जण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या आता 561 झाली आहे. तर खेड तालुक्यातील कुंभाड येथील एका 70 वर्षीय महिला रुग्णाचा 08 जुलै 2020 रोजी मृत्यू झाला होता. सदर मृत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मृताची संख्या आता 30 झाली आहे. त्यामुळे आता एकूण 287 रुग्ण कोरोना ऍक्टिव्ह आहेत. पैकी 09 रुग्ण होम आयसोलेशन असून, 4 रुग्ण इतर जिल्हयात उपचारासाठी गेले आहेत.
*अॅक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन*