महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात जखमी झालेल्या पक्षांना स्थानिकांनी दिले जीवदान - Ratnagiri Nisarga Cyclone Effect

रत्नागिरीत वादळी वाऱ्यांमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असून शेकडो पक्षी जखमी झाले आहेत. रत्नागिरीजवळच्या भाट्ये गावात वादळामुळे अनेक घारी जमिनीवर जखमी होऊन पडल्या होत्या. या गावातील स्थानिकांनी त्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवले. जखमी घारींवर या गावकऱ्यांनी उपचार केले. थोडी ऊब मिळाल्यानंतर काही वेळात या घारी उडून गेल्या.

injured Bird
जखमी घार

By

Published : Jun 3, 2020, 3:25 PM IST

रत्नागिरी -कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. किनाऱयावरील जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. वादळी वाऱ्यांमुळे अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला असून शेकडो पक्षी जखमी झाले आहेत. अशा जखमी पक्षांना स्थानिक नागरिकांनी औषधोपचार करून जीवनदान दिले आहे.

चक्रीवादळाच्या तडाख्यात जखमी झालेल्या पक्षांना स्थानिकांनी दिले जीवदान

रत्नागिरीजवळच्या भाट्ये गावात वादळामुळे अनेक घारी जमिनीवर जखमी होऊन पडल्या होत्या. या गावातील स्थानिकांनी त्यांना उचलून सुरक्षित ठिकाणी ठेवले. जखमी घारींवर या गावकऱ्यांनी उपचार केले. थोडी ऊब मिळाल्यानंतर काही वेळात या घारी उडून गेल्या. स्थानिक तरूण विकी मोरे, रोहित मुरकर, अभिषेक मुरकर, बिपीन पटेल, स्वप्नील चव्हाण यांनी या घारींचे उपचार केले. घारींप्रमाणेच विविध शेकडो पक्षी वादळामुळे बेघर झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details