महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिवेली गावातील डोंगर लागला खचू; प्रशासनाने केली पाहणी - Hill

प्रशासनाकडून माती, दरड, झाडे बाजूला करण्यात आली आणि मार्ग खुला करण्यात आला. मात्र, यापासून ग्रामस्थांना कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चिवेली डोंगराचा भाग रस्त्यावर कोसळला

By

Published : Jul 13, 2019, 5:12 PM IST

रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील चिवेली गावातील डोंगर खचू लागला आहे. डोंगर खचू लागल्याने माती रस्त्यावर येत आहे, त्यामुळे या मार्गावरच्या वाहतुकीवरही परिणाम होत आहे. प्रशासनाकडून याची पाहणी करण्यात आली.

चिवेली डोंगराचा भाग रस्त्यावर कोसळला

चिवेली फाटा ते चिवेली बंदर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी डोंगराच्या काही भागाची कटाई करण्यात आली होती. मात्र, सध्या पावसामुळे या डोंगराचा काही भाग खचू लागला आहे.

डोंगराचा काही भाग गुरुवारी खचला होता. त्यानंतर शुक्रवारीही काही भाग खचला आणि माती, झाडे थेट रस्त्यावर आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details