महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूर ओसरल्यानंतरही चिपळूणमध्ये चिखलाचं साम्राज्य..वाचा 'ईटीव्ही भारत'चा खास ग्राऊंड रिपोर्ट - etv bharat

चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातही आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर चिखल आहे. हा चिखलामुळे गटारं तुंबली आहेत. गटारांतून चिखल रुतून बसला आहे. रस्त्यांवरही पाहाल तिकडे चिखलच दिसत आहे. सध्या हा चिखल काढण्याचं काम सुरू आहे.

चिपळूण
चिपळूण

By

Published : Aug 1, 2021, 3:34 PM IST

रत्नागिरी - चिपळूणमध्ये आलेला महापूर ओसरून 8 दिवस होऊन गेले आहेत. मात्र, आजही चिपळूणमधल्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. आठ दिवसांनंतरही परिस्थिती पूर्वपदावर नाही. त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात या पुराचा फटका बसला आहे. याचा अंदाज इथली परिस्थिती बघितल्यावर येतो. मुंबईतून आलेल्या अद्यावत यंत्रणांनी हा चिखल काढण्याचं काम सध्या सुरू आहे. स्थानिक नागरिकही आपापल्या परिने हा चिखल उपसण्याचं काम करत आहेत.

'ईटीव्ही भारत'चा खास ग्राऊंड रिपोर्ट
पेठमाप परिसर अद्यापही चिखलात
चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातही आजच्या घडीला मोठ्या प्रमाणावर चिखल आहे. हा चिखलामुळे गटारं तुंबली आहेत. गटारांतून चिखल रुतून बसला आहे. रस्त्यांवरही पाहाल तिकडे चिखलच दिसत आहे. सध्या हा चिखल काढण्याचं काम सुरू आहे. परिस्थिती पूर्वपदावर यायला अजून काही कालावधी जाऊ शकतो. मात्र, आता पुरानंतर सर्वस्व वाहून गेलेल्यांंसमोर चिखलातूनच नवी वाट शोधावी लागत आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.

ABOUT THE AUTHOR

...view details