रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर आज 'द बर्निग कार' चा थरार पहायला मिळाला. गाडीचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला आणि यामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील बोरज गावानजीक सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबई-गोवा महामार्गावर 'द बर्निंग कार'; चालकाचा मृत्यू - चालकाचाही मृत्यू,
मुंबई गोवा महामार्गावर आज 'बर्निग द कार' चा थरार पहायला मिळाला. गाडीचा स्फोट होऊन गाडीने पेट घेतला आणि यामध्ये चालकाचा होरपळून मृत्यू झाला. खेड तालुक्यातील बोरज गावानजीक सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अल्टो कारचा बोरजनजीक मोठा स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूच्या लोकांनाही क्षणभर काय झालं याचा अंदाज आला नाही. दरम्यान आवाज ऐकून नजीकच्या बोरज गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कारला लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतलं होते. कारला लागलेल्या आगीत कारमधील चालकाचा अक्षरशः कोळसा झाला आहे.
आग मोठी असल्याने पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली. या दुर्घटनेनंतर महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती कळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान आग विझवल्यानंतर कार मधील चालकाला पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढले. या स्फोटामध्ये कारचा आणि कार चालकाचा अक्षरशः कोळसा झाल्याने ही गाडी कोणाची होती, चालक कोण होता, याचा तपास पोलीस करत आहेत.