मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू - Ratnagiri accident
20:29 December 06
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात..
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जण जागीच ठार झाले आहेत. काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार या गाडीतून एकाच कुटुंबातील पाच ते सहा जण प्रवास करत होते. अपघातानंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक तपास सुरू आहे.