महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीतील कार्यक्रमाला रत्नागिरीतीलही 8 ते 10 जण ?

दिल्ली येथील मर्कज येथे रत्नागिरीतील 8 ते 10 जण जाऊन आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता पोलिसांनी कोणतिही प्रतिक्रिया दिली नाही.

जिल्हा रुग्णालय
जिल्हा रुग्णालय

By

Published : Apr 1, 2020, 4:00 PM IST

रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्ह्याचे देखील दिल्लीतील मर्कज कनेक्शन समोर आले आहे. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील आठ ते दहा जण गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत पोलिसांना विचारणा केली असता तरी पोलीस यावर अधिकृत काहीही बोलायला तयार नाहीत.

या आठ ते दहा जणांचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्या-त्या तालुक्यातील तहसीलदार सध्या त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, आता दिल्लीतील मर्कज येथे जिल्ह्यातील आठ ते दहा जण गेल्याची बाब आता समोर येत असल्याने ही गोष्ट आता जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी ठरणारी आहे.

तर तिघेजण तेथूनच उत्तर प्रदेशमध्ये गेल्याची माहिती मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीतून रत्नागिरीत आलेल्या एकाला रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. ही व्यक्ती मर्कजला गेली होती की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्या व्यक्तीवर सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हेही वाचा -रत्नागिरीत कोरोना रुग्णाचा दुसरा अहवालही 'निगेटिव्ह', आता एकही रुग्ण नाही

ABOUT THE AUTHOR

...view details