रत्नागिरी - जिल्ह्यात आणखी 10 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 400चा टप्पा ओलांडला असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 402 वर पोहोचली आहे.
रत्नागिरीत कोरोनाचे 10 नवे रुग्ण, बाधितांचा आकडा चारशेपार - रत्नागिरी कोरोना अपडेट
रत्नागिरीतून आज आणखी सात रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 267 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण अॅक्टिव्ह रुग्ण 118 आहेत.
जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आज आणखी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी 5 रत्नागिरीतील असून कामथे येथील 1, दापोली येथील 2 आणि संगमेश्वर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. यातील दापोली येथील एक रुग्णाला 11 जूनला रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. मात्र, त्याचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल मृत्यूनंतर प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 16वर पोहोचली आहे.
आज आणखी सात रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 267 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकूण अॅक्टिव्ह रुग्ण 118 आहेत.