रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज आणखी दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे, रत्नागिरीतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 300 चा आकडा पार केला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 307 झाली आहे.
रत्नागिरीत आढळले कोरोनाचे १० नवे रुग्ण, जिल्ह्यातील बाधितांची संख्या तीनशे पार - death of corona patients in ratnagiri
सोमवारी रात्री 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी आणखी दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कामथेतील 4 , संगमेश्वर 2 , रत्नागिरीत 1 , दापोली 2 आणि राजापूरातील एका रुग्णाचा समावेश आहे.
रत्नागिरीत आढळले कोरोनाचे दहा नवे रुग्ण
सोमवारी रात्री 10 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी आणखी दहा जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कामथेतील 4 , संगमेश्वर 2 , रत्नागिरीत 1 , दापोली 2 आणि राजापूरातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 120 आहे. या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, सध्या 168 जणांवर उपचार सुरु आहेत.