रत्नागिरी - जिल्ह्यातील तापमान कमाल ३६ ते किमान ३१ अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेले आठवठाभर कमाल तापमान ३२ ते ३६ दरम्यान राहिले आहे. ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत आणखीन वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
वाढलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण, ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पाऊस - पाणी
गेले आठवडाभर वातावरण काहीसे ढगाळ असून उष्णता प्रचंड वाढली आहे. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह काही ठिकाणी पाऊसही झाला आहे.
गेले आठवडाभर वातावरण काहीसे ढगाळ असून उष्णता प्रचंड वाढली आहे. वातावरणातील या बदलामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गसह काही ठिकाणी पाऊसही झाला आहे. वाढत्या उन्हामुळे घराबाहेर पडल्यानंतर वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. दुचाकी चालवताना महिला स्कार्फचा वापर करत आहेत. तर, पुरुषही तोंडाला रुमालाचा वापर करताना दिसत आहे. तर, काहीजण छत्रीचाही वापर करत आहेत.
कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत आणि ज्यूस यांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. कलिंगड आणि काकडीला मागणी सध्या मोठी आहे. पाणी थंड ठेवण्यासाठी माठाला सुद्धा मागणी वाढल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, अन्य विभागाच्या तुलनेत कोकणातील तापमान थोडे कमी असल्याने अनेक पर्यटक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत.