रत्नागिरी- निसर्ग चक्रीवादळात भरकटलेल्या 'एसटी बसरा स्टार' या जहाजावरील असलेले डिझेल बाहेर काढण्यात काही तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी या जहाजातील डिझेल काढणे शक्य झाले नाही. निसर्ग चक्रीवादळात भरकटलेले विदेशी जहाज गेल्या 21 दिवसांपासून मिऱ्या येथे अडकलेले आहे. या जहाजावर जवळपास 25 हजार लिटर डिझेल आहे. जर डिझेलची गळती सुरू झाली, तर समुद्रजिवांना धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे डिझेल जहाजातून बाहेर काढणे आवश्यक आहे.
'त्या' जहाजावरील डिझेल बाहेर काढताना येतायेत तांत्रिक अडचणी - st basra star ship in ratnagiri
मंगळवारी या जहाजातील इंधन काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठीची पुर्वतयारी देखील करण्यात आली. मात्र लाटांचा मारा आणि भरती ओहोटीच्या गणितामुळे ही डिझेल काढण्याच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही.
!['त्या' जहाजावरील डिझेल बाहेर काढताना येतायेत तांत्रिक अडचणी ship](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7750836-735-7750836-1592992901497.jpg)
मंगळवारी या जहाजातील इंधन काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यासाठीची पुर्वतयारी देखील करण्यात आली. मात्र लाटांचा मारा आणि भरती ओहोटीच्या गणितामुळे ही डिझेल काढण्याच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. ओहोटी पाहून पंपाद्वारे हे डिझेल काढण्यात येणार होते. पण तांत्रिक अडचणीमुळे ते सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे आता गुरुवारपासून पुन्हा हे डिझेल काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
शिपिंग कंपनी आणि जहाजावरील क्रू च्या मदतीने विद्युत पंप जोडून मंगळवारी सायंकाळी डिझेल काढण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात आले. पंपाची पाईप जहाजावरून खाली घेऊन बंधाऱ्यावरून ती टँकरपर्यंत आणण्यात आली होती. मात्र लाटामुळे जहाज हेलकावे खात असल्याने प्रत्यक्ष डिझेल ऑपरेशन सुरू झाले नाही. आजही तांत्रिक अडचणींमुळे हे डिझेल काढता आले नाही. त्यामुळे गुरुवारी पुन्हा एकदा डिझेल काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. डिझेल काढल्यानंतर जहाज काढण्याचे मुख्य रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे.