महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मार्चपासून शाळा बंद... मात्र हीच संधी साधत शिक्षकांचा अभिनव उपक्रम! - ratnagiri primary schools

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि देशभर लॉकडाऊन सुरू झाले. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्वच बंद होतं. त्यामुळे साहजिकच शाळाही बंद झाल्या. मात्र हीच संधी साधत पाथरट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात घेतला आणि अबोल भिंती फक्त सजवल्या नाही, तर त्या बोलूही लागल्या.

primary schools in ratnagiri
मार्चपासून शाळा बंद...मात्र हीच संधी साधत शिक्षकांचा अभिनव उपक्रम!

By

Published : Aug 6, 2020, 12:23 PM IST

Updated : Aug 6, 2020, 4:35 PM IST

रत्नागिरी - मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि देशभर लॉकडाऊन सुरू झाले. अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्वच बंद होतं. त्यामुळे साहजिकच शाळाही बंद झाल्या. मात्र हीच संधी साधत पाथरट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी स्वतः रंगाचा ब्रश हातात घेतला आणि अबोल भिंती फक्त सजवल्या नाही, तर त्या बोलूही लागल्या.

शिक्षकांचा अभिनव उपक्रम पाहा...

सृजनशील शिक्षक शाळेत आले, की शाळेचा चेहरामोहरा कसा बदलतो याचे उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्हा परिषदची पाथरट शाळा. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची ही शाळा आहे. या शाळेत बदली होऊन आलेले शिक्षक रामचंद्र माधवराव परचंडे आणि केशव सूर्यभान घोरोवाडे यांनी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश सावंत, समिती सदस्य, पालक व ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळेत आज पर्यंत विविध उपक्रम राबवले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात या शाळेतील दोन्ही शिक्षकांनी स्वतः शाळेच्या संरक्षक भिंतीचं रंगकाम केलं. नुसतं रंगकाम केलं नाही, तर या कामाच्या माध्यमातून मुलांसाठी संदेशही दिला.

या शाळेची इमारत जुनी असल्याने रंगकाम करून त्याची शोभा वाढवण्याचा प्रस्ताव मुख्याध्यापक रामचंद्र परचंडे यांनी शाळा व्यवस्थापन समितीसमोर ठेवला. समितीने त्याला मान्यता दिली. आणि स्वतः रामचंद्र परचंडे यांनी दुसरे शिक्षक केशव घोरोवाडे यांच्या साथीने हे काम हाती घेतलं. पेंटिंगची आवड असलेल्या या शिक्षकांनी स्वतः हातात ब्रश घेऊन शाळेचं रंगकाम केलं. शाळेचे प्रवेशद्वार व संरक्षक भिंतीवर शिक्षणाची माहिती देणारी पेंटिंग करण्यात आलं. मुलं कार्टूनकडे आकर्षित होतात हे लक्षात घेऊन कार्टूनच्या चित्रातून शैक्षणिक संदेश देण्यारे फलक भिंतींवर रेखाटण्यात आले.

स्वच्छतेचं महत्त्व, सर्वधर्म समभाव, बेटी बचाओ बेटी पढाओ, असे संदेश या पेंटिंगमधून देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यावी, याबाबतही पेंटिंगच्या माध्यमातून भिंतींवर संदेश रेखाटण्यात आले आहेत. 'मस्कचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, वेळोवेळी हात साबणाने धुवा, असे संदेश या चित्रांमधून देण्यात आले आहेत. एकूणच पेटिंगमधून जिल्हा परिषदेच्या शाळा कशा दर्जेदार आहेत याची मांडणी करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीवरील या पेंटिंगमुळे शाळेच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. गुरुजींच्या या कामाचं सध्या गावातूनच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातून कौतुक होत आहे.

Last Updated : Aug 6, 2020, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details