रत्नागिरी - शहरातील 'माहेर' संस्थेतील अनाथ, निराधार मुलांनी शनिवारी सध्या देशभर गाजत असलेला 'तान्हाजी' चित्रपट प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन पाहिला. यामधील काही मुले यापूर्वी कधीही चित्रपटगृहात गेली नव्हती. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
'माहेर' संस्थेतील मुलांनी पाहिला 'तान्हाजी' चित्रपट हेही वाचा - 'भारताच्या इतिहासात इंग्रजांना मोठं करण्याचा सैफ अली खानचा प्रयत्न'
'आपुलकी' संस्थेच्या सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेऊन मुलांना हा चित्रपट दाखवला. अनेक पालकांनी आपल्या मुलांना हा चित्रपट सिनेमागृहात नेऊन दाखवला. या चित्रपटाचा आनंद अनाथ मुलांनाही घेता यावा, ही संधी या संस्थेने उपलब्ध करून दिली. या उपक्रमादरम्यान आपुलकी संस्थेचे स्वप्नील पाथरे, ब्रिजेश साळवी, पत्रकार जान्हवी पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 'तान्हाजी' चित्रपटात 'चुलत्या'ची भूमिका साकारणाऱ्या कैलास यांचा भोकरदनमध्ये सत्कार
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ' तान्हाजी: द अनसंग वॉरियर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांमधील शूरवीर तानाजी मालुसरेंनी सर केलेल्या 'कोंढाणा' किल्ल्याची शौर्यगाथा 'तान्हाजी' या चित्रपटात दाखविण्यात आली आहे.