रत्नागिरी - काही लोकांना वाटले होते, की भाजप रसातळाला जाईल, पण तसे होत नाही. सोशल मिडियावर तसे चित्र दाखवण्याचा प्रयत्न होतो. मात्र तसे होणार नाही, असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी ( Swami Ramvdev Baba on BJP performance ) व्यक्त केले. योग शिबिरासाठी रत्नागिरी ( Swami Ramdev Ratnagiri visit ) दौऱ्यावर आले असताना ते माध्यमांशी बोलत होते.
योगगुरू रामदेव बाबा यांनी ऐतिहासिक पतित पावन मंदिर ( Patit Pavan Mandir ) , वीर सावरकर स्मारक ( Veer Savarkar Smark Ratnagiri ) आणि लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळाला ( Lokmany Gangadhar birthplace ) भेट दिली. पत्रकार परिषदेत बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळेल असे एक्झिट पोलमधून दिसत आहे. भाजपसोबत केजरीवालसुद्धा चांगली कामगिरी करतील. तर काँग्रेसला राज्यस्तरावर नेतृत्वाचा अभाव आहे. राष्ट्रीय स्तरावर आणखी ओजस्वीता मिळाली तर काँग्रेस अधीक बळकट होईल. या निवडणुकीत सर्वांना आत्मपरिक्षण करण्याची संधी मिळेल, असे मत योग गुरु रामदेव बाबा यांनी व्यक्त केले. बाकी यावर माझ्यासारखा फकीर काय बोलणार, असे सांगायला ते विसरले नाहीत.
हेही वाचा-Assembly Election 2022 : काँग्रेसला साथ देणाऱ्या दिगांबर कामतांची ही आहे सहावी निवडणूक
केंद्रीय यंत्रणाची धाड म्हणजे दोन वजिरांची लढत