महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रामदास कदम म्हणजे जादूटोणावाले - माजी आमदार सूर्यकांत दळवी - suryakant dalvi

कदम यांना विरोधी पक्षनेता बनण्यासाठी देखील त्यांनी विधानसभेत बंगाली बाबांकडून जादुटोणा करून घेतला होता, असा दावा दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

संपादीत छायाचित्र

By

Published : Sep 9, 2019, 7:59 AM IST

रत्नागिरी- पर्यावरण मंत्री रामदास कदम म्हणजे भगत आणि जादूटोणावाले असल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला आहे. रामदास कदम हे बंगालीबाबांना सोबत घेऊन फिरतात. विशेष म्हणजे कदम यांना विरोधी पक्षनेता बनण्यासाठी देखील त्यांनी विधानसभेत बंगाली बाबांकडून जादुटोणा करून घेतला होता, असा दावा सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

माजी आमदार सूर्यकांत दळवी


दर अमावस्येला रामदास कदम भगतगिरी करायचे, जामगे येथील घराच्या गच्चीवर रामदास कदम आणि बंगाली बाबा रात्रभर कोहळे कापयचे, असा दावा देखील सूर्यकांत दळवी यांनी केलाय. रामदास कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात घुसखोरी करू नये, ज्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला त्या मतदार संघातून निवडणूक लढवावी. माझ्या मतदार संघात मी आमदार नसलो तरी चालेल पण या मतदारसंघातला आणि पक्षासाठी ज्याच योगदान आहे, असा उमेदवार कोणीही चालेल असेही सूर्यकांत दळवी म्हणाले. कदम यांनी आत्तापर्यंत चारवेळा पक्षाच्या विरोधात काम केले आहे. याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा ही सूर्यकांत दळवी यांनी केला आहे.

हेही वाचा - आमच ठरलंय... शिवसेना- भाजपचा प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री - रामदास कदम

ABOUT THE AUTHOR

...view details