रत्नागिरी - कोकणात आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. २०१९ ची विधानसभा घोषित होण्याआधीच कोकणात शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यात जोरदार वाद पेटले आहेत.
'रामदास कदमांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा' - shivsena
२०१९ ची विधानसभा घोषित होण्याआधीच कोकणात शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यात जोरदार वाद पेटले आहेत.
रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघामधून आगामी निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत, मात्र त्यांना तेथील शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचा विरोध आहे. आतापासून दोघांचे एकमेकाविरूद्ध आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नुकतेच रामदास कदम यांनी माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यावर आरोप करत म्हणाले 'मी त्यांना निवडणुकीत ५० हजार देत होतो, त्यांना गाडीही मिळवून दिली होती' असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या टीकेला माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले रामदास कदम हे बिनबुडाचे आरोप करत खोटे बोलत आहेत. त्यांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा, अशी टीका दळवी यांनी केली आहे.