रत्नागिरी धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प ( Ratnagiri Dhopeshwar Refinery Project ) समर्थक तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची भेट घेतली. प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवणाऱ्या एनजीओंवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आता राज्यात आणि केंद्रात आता आमचे सरकार असल्याने रिफायनरीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, असे मिश्रा यांनी सांगितले. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्प समर्थक तसेच शेतकऱ्यांनी घेतली केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची ( Union Minister of State for Home Affairs ) ( Ajay Kumar Mishra ) भेट घेतली.
प्रकल्पाबाबत गैरसमज पसरवणाऱ्या एनजीओंवर कारवाईची मागणीधोपेश्वर रिफायनरी प्रकल्प समर्थक तसेच या परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांची भेट घेतली. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासाठी चार हजार एकर जागा देण्यास या समर्थकांनी सहमती दर्शवली आहे. धोपेश्वर रिफायनरी प्रकल्पासंदर्भात एनजीओंकडून चुकीची माहिती दिली जात आहे. या एनजीओंवर कारवाई करण्याची मागणी रिफायनरी समर्थकांनी केली आहे. याबाबत एक निवेदनही देण्यात आले आहे. रिफायनरीसाठी आवश्यक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पूर्वीच्या सरकारने जमीन उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता. मात्र, राज्यात आणि केंद्रात आता आमचे सरकार असल्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी सांगितले.
निवेदनात काय म्हटले आहे भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी हा रिफायनरी प्रकल्प राजापूरच्या नाणार परिसरात 2017 मध्ये पहिल्यांदा हा प्रकल्प होणार होता. मात्र, मोठ्या प्रमाणावर घरे आणि मंदिरे विस्थापित होत असल्याने नाणार परिसरात या प्रकल्पाला विरोध झाला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने 2019 मध्ये या प्रकल्पासाठी नाणार क्षेत्राची अधिसूचना रद्द करून 2022 मध्ये बारसू, गोवळ, पान्हे, नाटे गावच्या जमीन प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला. या नवीन ठिकाणी कोणत्याही घराचे किंवा मंदिराचे विस्थापन होणार नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे.
या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यात लाखो रुपयांचा रोजगार उपलब्ध या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यात लाखो रुपयांचा रोजगार उपलब्ध होणार असून, जिल्ह्याच्या आर्थिक स्थितीत खूप सकारात्मक बदल होणार आहे. वैद्यकीय शिक्षण आणि रस्ते प्रकल्प विकसित केले जातील. त्यामुळेच राजापूर तालुक्यातील सुमारे 125 गावे, 55 सामाजिक संस्थांनी या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. या संदर्भात 13 जुलै 2022 रोजी परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींना एमआयडीसीने जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात बोलावले होते. या बैठकीत प्रकल्पासाठी लागणाऱ्या साडेचार हजार एकर जागेपैकी तीन हजार एकर जागेची संमत्तीपत्र स्थानिक शेतकऱ्यांनी दिली होती.