महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सुजय विखे पाटलांना केवळ लोकसभेच्या जागेचं आकर्षण' - सुनील तटकरे, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, गुहागर

सुजय विखे-पाटील यांना भाजपचं आकर्षण नसून हे केवळ लोकसभेच्या जागेसाठी असलेलं आकर्षण आहे. सुनिल तटकरेंची सुजय विखेंवर टीका

सुनील तटकरे

By

Published : Mar 13, 2019, 7:16 PM IST

रत्नागिरी - सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सडकून टीका केली आहे. सुजय विखे-पाटील यांना भाजपचं आकर्षण नसून हे केवळ लोकसभेच्या जागेसाठी असलेलं आकर्षण आहे. गुहागरमध्ये झालेल्या सभेत तटकरे यांनी सुजय यांच्यावर ही टीका केली.

सुनील तटकरे


यासंदर्भात बोलताना तटकरे म्हणाले, की या निर्णयात विचारांचा कुठलाही लवलेश दिसत नाही. ध्येयवादाचाही विचार नाही. आहे तो फक्त स्वार्थ ! अखेरच्या क्षणापर्यंत आत्यंतिक विरोधाभास असलेल्या राजकीय पक्षामध्ये जाणं हे केवळ आणि केवळ सत्ता मिळविण्यासाठीच आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details