महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून; तटकरेंचा शिवसेनेला टोला - सुनील तटकरे

रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांची गुहागर येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

गुहाघर येथील सभेत बोलताना सुनील तटकरे

By

Published : Apr 14, 2019, 8:52 AM IST

रत्नागिरी - रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी गुहागर येथील जाहीर सभेत शिवसेनेवर जोरदार शाब्दिक प्रहार केला. शिवसेनेच्या गुहागरमधील सभेत उद्धव ठाकरेंसह एकही नेता विकासावर बोलला नाही. त्यांनी केवळ मला लक्ष्य केले. तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलता. स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून हा तुमचा धंदा आता कोकणवासीय पुढच्या काळात सहन करणार नाहीत, अशी टीका तटकरे यांनी शिवसेनेवर केली.

गुहाघर येथील सभेत बोलताना सुनील तटकरे

तटकरे म्हणाले की, माझ्या विरुद्ध चौकशी सुरू आहे, पाच वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले, पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलता, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली. तसेच अनंत गीते यांनी कुणबी समाजासाठी काहीच केले नाही. केवळ आश्वासने दिली. आपण खासदार झाल्यावर चारही तालुक्यांमध्ये कुणबी भवन उभारु, असे आश्वासन यावेळी तटकरे यांनी दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details