रत्नागिरी - राज ठाकरे यांच्या सभांबाबत बोलतांना तटकरे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या सभेला ग्लॅमर निर्माण झाले आहे. लोक उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थित राहत होती. लोकशाहीला काय घातक आहे हे राज ठाकरे यांनी आपल्या भाषाणातून पुराव्यानीशी दाखवून दिले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक असेल असे तटकरे म्हणाले.
'विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक'
लोकसभा निवडणुकीसह आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक असेल असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे म्हणाले.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी मोदी-शहा यांच्या विरोधात जाहीर सभा घेत, राजकीय धुरळा उडवला होता. याबाबत सुनील तटकरे यांना विचारलं असता, तटकरे म्हणाले की राज ठाकरे यांच्या सभेला ग्लॅमर निर्माण झालं होतं, लोकं उत्स्फूर्तपणे सभेला उपस्थित राहत होती. लोकशाहीला काय घातक आहे हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका निर्णायक असेल असे मत देखील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केले.
निवडणूक आयोगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या सभांचे खर्च मागितल्याप्रकरणी सुनील तटकरे यांनी राज यांची पाठराखण केली. निवडणूक आयोग प्रत्येक राजकीय पक्षाला विचारू शकतो. खर्च मागवणे याचा अर्थ उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी सभा केली असा होत नाही. या संदर्भात निवडणुक आयोग निर्णय घेईल, या प्रकरणी मनसे आपली भुमिका मांडेल. निवडणुक आयोगाने थेट पंतप्रधानांना नोटिस काढली, राहूल गांधींना नोटिस काढली, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रचारासाठी बंदी केली, त्यामुळे निवडणूक आगोय त्यांना खर्च मागू शकतो.