रत्नागिरी- अजित पवार हे एक भावनाप्रधान व्यक्तिमत्त्व आहे. अनेकांनी अजित पवारांची जी प्रतिमा कठोर पद्धतीची निर्माण केली, तशी वस्तुस्थिती नाही. प्रत्येक माणसाला मन आहे, संवेदना आहेत. वय वर्षे 80 असताना आज शरद पवार यांचे नाव शिखर बँक प्रकरणात आले आहे. त्यामुळे अजित पवारांनी राजीनामा दिला, असे मत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.
तर राज्यातील चित्र आता बदलत आहे. 'लोकांनी आता ठरवलयं' अशा शेलक्या शब्दात सुनिल तटकरे यांनी सरकारवर घणाघात केला आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, सरकार कशा पद्धतीने आकसाने वागत आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेला समजले आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.