रत्नागिरी - आषाढी एकादशीचा उत्साह सध्या संपूर्ण राज्यात पहायला मिळतो. पंढरपुरात भक्तांचा मेळा जमला असताना रत्नागिरीतल्या इंग्लिश मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अनोखी दिंडी काढली. मुलांनी ग्रंथदिंडीच्या माध्यमातून झाडे लावा झाडे जगवा, शिकून मोठे व्हा, असा संदेश दिला.
एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढत दिला सामाजिक संदेश - खंडाळा
शुक्रवारी एकादशीच्या निमित्ताने खंडाळा येथील मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा म्हणत पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठीचा संदेश दिला.
शुक्रवारी एकादशीच्या पर्वावर खंडाळा येथील मिडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे आयोजन केले होते. वारकऱ्यांच्या वेषभूषेत आलेल्या या विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचे गुणगान करत दिंडीला सुरुवात केली. खंडाळा गावातनू ही ग्रंथदिंडी काढत विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा म्हणत पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठीचा संदेश दिला. दिंडी गावातील मध्य चौकात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी फेर धरत गोल रिंगण केले. या रिंगणात विठूरायाचे चित्र रेखाटण्यात आले होते. जवळपास अडिचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या दिंडीत सहभाग नोंदवला. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या बाल वारकऱ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता.