रत्नागिरी -तालुक्यातील पाली गावात कोरोनाचे २ बाधीत रुग्ण आढळून आल्याने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवावे. तसेच २ आठवड्यांसाठी आठवडाबाजारही बंद ठेवावा, असे आवाहन ग्रामपंचायत पालीतर्फे करण्यात आले आहे.
ग्रामकृतीदल समितीच्या बैठकीत निर्णय -
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्याने सर्वत्र दक्षता बाळगली जात आहे. पाली ग्रामपंचायत क्षेत्रातही २ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पाली गामपंचायतीच्या ग्रामकृतीदल समितीच्या पार पडलेल्या बैठकीत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, हायस्कुल, कॉलेज, आयटीआय, खासगी शिवकणी २७ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.