सिंधुदुर्ग : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सभागृहात केलेल्या विधानावरुन राजकारण तापले आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्यांची मागणी भाजप नेते, हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. ( sticker belongs to Sambhaji Maharaj ) छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्य रक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी मांडली आहे. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने बालशौर्य पुरस्कार देण्याची मागणी करताना अजित पवार यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
धरण वीर म्हणत आमदार नितेश राणे यांची अजित पवारांवर टीका :आम्ही हिंदवी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणणारच असे नितेश राणे म्हणाले. नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यासाठी धरणवीर असा शब्द वापरला. धरणवीर असणाऱ्यांना धर्मवीर ही पदवी कधीच कळणार नाही, अजित पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीच्या मंडळींना सांगतो, असे नितेश राणे म्हणाले. धर्मवीरांना समजणे हे राष्ट्रवादीला आणि पवारांना कधीच जमणार नाही असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना नितेश राणे यांनी सणसणीत टोला लगावला. अजित पवार यांच्याकडे थोडीपण लाज राहिली असेल तर महाराष्ट्राच्या विरोधी पक्षपदावर जो ठप्पा लागला आहे, तो त्यांनी राजीनामा देऊन पुसावा, अशा आशयाचे ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केले.