रत्नागिरी - निसर्ग चक्रिवादळामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगडमध्ये या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शासनाकडून रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तत्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये घेतलेल्या आढाव्यादरम्यान ही मदत जाहीर केली.
निसर्ग वादळ: रत्नागिरीसाठी 75 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटींची तत्काळ मदत जाहीर
निसर्ग चक्रिवादळामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्येही काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाकडून रत्नागिरीसाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तत्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे संपूर्ण कोकण परिसराची वाताहत झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रायगड जिल्ह्याचा दौरा करून पाहणी केली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांनी तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्स बोलावून रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी तात्काळ मदत जाहीर केली आहे.
या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार विनायक राऊत, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, पालकमंत्री अनिल परब, मंत्री दादा भुसे आणि सर्व जिल्हाधिकारी आणि आमदार योगेश कदम, आमदार वैभव नाईक आदी लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. या जिल्ह्यांमधील नुकसानीचा आढावा घेतला. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी तातडीची मदत जाहीर केली आहे. पंचनाम्यानंतर आणखी मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली