महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले - ST timetable collapses

एसटी विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा समोर आला आहे. डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले पहायला मिळाले.

st-timetable-collapses-due-to-diesel-shortage-in-ratnagiri
डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले

By

Published : Dec 18, 2019, 8:25 PM IST

रत्नागिरी - एसटी विभागाच्या भोंगळ कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. डिझेलच्या तुटवड्यामुळे आज सकाळपासून एसटीचे वेळापत्रक कोलमडलेले पहायला मिळाले. रत्नागिरी एसटी डेपोत डिझेलचा तुटवडा भासत असल्याने डिझेल भरण्यासाठी एसटीच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

डिझेलच्या तुटवड्यामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले

हेही वाचा - रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत मनसे शक्तीनिशी मैदानात

मंगळवारी डिझेलचा टॅकर आला नाही. रात्री उशिरा टॅकर आला. त्यामुळे सकाळी डिझेल भरण्यासाठी एसटीच्या एक किलोमिटर पर्यत रांगा पाहायला मिळत होत्या. याविषयी एसटी प्रशासनाला विचारल्यानंतर कुठल्या ही प्रकारचा डिझेलचा तुटवडा भासत नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, डिझेल नसल्याने एसटीचे वेळापत्रक पुरते कोलमडले होते.

हेही वाचा - आरे वारे येथे बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जीवितहानी टळली

ABOUT THE AUTHOR

...view details