रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे राज्यातील राज्य परिवहन सेवाही बंद होती. मात्र, बंद झालेली ही बससेवा 'अनलॉक 1' मध्ये हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
सध्या जिल्ह्यात 136 गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ही वाहतूक फक्त रत्नागिरी जिल्हाअंतर्गतच सुरू आहे. सुरुवातीला काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर आता हळूहळू बस फेऱ्यांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात एकूण 136 गाड्यांद्वारे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांद्वारे सध्या 324 फेऱ्या सोडल्या जात आहेत. यामध्ये सर्वाधिक देवरुख बस स्थानकातून 32 गाड्यांद्वारे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.