महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

७१ वर्ष एक प्रवास..! एसटीचा प्रवास सांगणारी 'लालपरी' रत्नागिरीत दाखल

राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी, म्हणजेच एसटीने काळानुसार कात टाकली आहे. नुकताच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आणि याच वर्धापनदिनी एसटीचा आजपर्यंतचा प्रवास सांगणारी एक लालपरी बस सुद्धा रवाना करण्यात आली होती. आज ही बस रत्नागिरीत दाखल झाली आहे. या बसला पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी एकच गर्दी केली होती.

रत्नागिरीत दाखल झालेल्या एसटीच्या लालपरीबद्दल माहिती सांगताना इटिव्ही चे प्रतिनिधी राकेश गुडेकर

By

Published : Jun 20, 2019, 5:31 PM IST

रत्नागिरी- राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी, म्हणजेच एसटीने काळानुसार कात टाकली आहे. नुकताच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आणि याच वर्धापनदिनी एसटीचा आजपर्यंतचा प्रवास सांगणारी एक लालपरी बस सुद्धा रवाना करण्यात आली होती. ३६ जिल्ह्यांमध्ये ही बस जाणार असून एकूण ५० दिवसांचा तिचा प्रवास आहे. आज ही बस रत्नागिरीत दाखल झाली आहे. या बसला पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी एकच गर्दी केली होती.

रत्नागिरीत दाखल झालेल्या एसटीच्या लालपरीबद्दल माहिती सांगताना ईटिव्ही चे प्रतिनिधी राकेश गुडेकर


एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत, एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या तसेच गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत. एसटीने लालपरी पासून सुरू केलेला प्रवास, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही, शिवशाही स्लिपर, विठाई ते आता रातराणी स्लिपर असा टप्प्यावर आणला आहे. त्यामुळे एसटीचा आजपर्यंतचा प्रवास, एसटीत झालेले बदल व एसटीच्या योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात, या उद्देशाने ही लालपरी जिल्ह्या-जिल्ह्यात पोहोचणार आहे. आज रत्नागिरीत दाखल झालेली ही लालपरी नेमकी कशी आहे, या उत्सुकतेपोटी रत्नागिरीकरांनी एकच गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details