महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"गणेशोत्सवानिमित्त चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेची विशेष गाडी सोडावी" - Nilesh rane demand

गावी सुखरूप जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांसह व्यवस्था करून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निलेश राणे यांनी या पत्राद्वारे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

Nilesh rane
निलेश राणे

By

Published : Jul 24, 2020, 1:26 PM IST

रत्नागिरी - अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना चाकरमान्यांचा निर्धोक प्रवास व्हावा. यासाठी आवश्यक त्या सावधगिरीच्या सर्व उपाययोजनासह विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी भाजपचे नेते निलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

राणे यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. गणेशोत्सव आणि कोकण हे अतूट नाते आहे. मुंबईसह कुठेही असलेला कोकणी माणूस या उत्सवासाठी गावी येतोच. मात्र, यावेळी कोरोनामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या साथरोगामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी कोकणी माणसांसाठी कोकण रेल्वे हा एक विश्वासार्ह आणि उत्तम पर्याय राहिला आहे.

गणेशोत्सवामध्ये कोकणी माणसाला त्याच्या गावी सुखरूप जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांसह व्यवस्था करून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निलेश राणे यांनी या पत्राद्वारे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details