महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोन्यासाठी कर्जबाजारी मुलाने आईचा दगडाने ठेचून केला खून अन् मग. . . . - Murder

मुलाने आईचा खून करुन मृतदेह जाळल्याने खळबळ उडाली. ही घटना लांजा तालुक्यातील साटवली येथे घडली आहे.

फातीमा काळसेकर

By

Published : Jun 19, 2019, 2:09 PM IST

Updated : Jun 19, 2019, 3:55 PM IST

रत्नागिरी- कर्जबाजारी मुलाने आईचा दगडाने ठेचून खून करुन मृतदेह जाळल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली. ही घटना लांजा तालुक्यातील साटवली येथे घडली असून मजहर काळसेकर असे त्या खुनी मुलाचे नाव आहे. तर फातीमा काळसेकर असे मृत आईचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनी मजहरच्या मुसक्या आवळल्या आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी आणि मृत महिलेचा पती


लांजा तालुक्यातील साटवली गोळवशी या गावात फातीमा काळसेकर पती आणि मुलांसोबत राहात असत. फातीमा यांचा सर्वात छोटा मुलगा मजहर हा कर्जबाजारी झाला होता. त्यात मजहरच्या पत्नीशी फातिमा यांचे सतत भांडण व्हायचे. बॅकेच्या कर्जाचे हप्ते थकल्याने मजहर आईकडे सोन्याचे दागिने देण्याचा तगादा लावत असे. मात्र त्या मजहरला दागिने देण्यास नकार देत असत.


घटनेच्या दिवशी फातिमा या लांजाला आठवडा बाजारात गेल्या होत्या. यावेळी त्यांना मजहरने वाटेत गाठले. दुचाकीने त्यांना घेवून साटवली रोडवर निर्जन रसत्यावर आला. यावेळी मजहरने दुचाकी थांबवून आईच्या डोक्यात दगड घातला. हा घाव इतका वर्मी होता, की फातिमा खाली कोसळल्या. तोच दगड उचलून त्याने फातिमा यांच्या पायावर घातला. चेहरा आणि डोळे दगड घालून त्यांने विदृप केले. जवळ असलेल्या वाड्यातील गवताचा पेंढा आईच्या अंगावर पसरून त्यावर पेट्रोल ओतून त्याने तो जाळून टाकला.


यानंतर काहीही न घडल्याच्या आविर्भावात मजहर घरी परतला. घरच्यांनी फातिमा रात्रीपर्यंत घरी न आल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तीन दिवसांनी जळलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्यानंतर लांजा पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली.


लांजा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत मजहरने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावत गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सखोल चौकशी केल्यावर मजहरने खुनाची कबुली दिली. आईची ओळख पटू नये, म्हणून मजहरने आईची चप्पल तिचा चष्मा आणि तिच्या सामानासकट तिला जाळून टाकले. ज्या दगडाने मजहरने आईला ठेचून मारले, तो दगड आणि अंगावरील दागिने जप्त करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Last Updated : Jun 19, 2019, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details