महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रत्नागिरीत सर्पसह विंचू दंशाचे प्रमाण वाढले, जिल्हा रुग्णालयात १६४ रुग्ण दाखल - रत्नागिरीत सर्प आणि विंचू दंशाचे प्रमाण

ऐन भात कापणीच्या दिवसांत पाऊस आल्याने सुकविण्यासाठी कातळावर पसरवलेल्या भाताच्या पेंढया अधिक काळ एकाच जागेवर राहिल्या. त्यामुळे पेंढयांच्या खाली मोठया प्रमाणात विंचू आढळून येताना दिसत आहेत.

सर्प दंश आणि विंचू दंशाचे प्रमाण वाढले, जिल्हा रुग्णालयात १६४ रुग्ण दाखल

By

Published : Nov 7, 2019, 11:41 AM IST

Updated : Nov 7, 2019, 8:07 PM IST

रत्नागिरी - भात कापणीच्या कालावधी सुरू असल्यामुळे जिल्ह्यात सर्प, विंचूदंश होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मागील 2 महिन्यात केवळ जिल्हा रुग्णालयात १६४ रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामध्ये १२४ सर्पदंश तर ४० विंचूदंश झालेल्या रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ हजारच्या पुढे गेल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात सर्प आणि विंचू दंशाचे प्रमाण वाढले

ऐन भात कापणीच्या दिवसात पाऊस आल्याने सुकविण्यासाठी कातळावर पसरलेल्या भाताच्या पेंढ्या अधिक काळ एकाच जागेवर राहिल्या. त्यामुळे पेंढयांच्या खाली मोठ्या प्रमाणात विंचू आढळत आहेत. पाऊस थांबल्यानंतर भाताच्या पेंढ्या परतवणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात विंचूदंश झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा -'त्या' तहसीलदारांना जिवंत जाळणाऱ्या आरोपीचा रुग्णालयात मृत्यू

जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हा आजुबाजुच्या पंचक्रोशीला दळणवळणाच्या दृष्टीने जवळचा आहे. त्यामुळे लगतच्या वाटद , मालगुंड तसेच संगमेश्वर तालुक्यातील फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील रुग्ण जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी येतात.

हेही वाचा -रायगडमध्ये तिहेरी हत्याकांड, पतीने पत्नीसह २ लहान मुलांची केली हत्या

सर्पदंश, विंचूदंश झालेल्या रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार झाल्यानंतरही ज्यांची पकृती चिंताजनक असते. त्यांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात येते. सप्टेंबर महिन्यात सर्पदंशाचे ५० रुग्ण तर विंचूदंशांचे १५ रुग्ण दाखल झाले होते. याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात सर्पदंशाचे ७४ जणांना तर विंचूदंशांच्या २५ जणांना जिल्हा रुग्णालायत दाखल करण्यात आले होते.

Last Updated : Nov 7, 2019, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details