रत्नागिरी- शहराच्या मुख्य भागात असलेले श्री विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. 300 वर्षांहून अधिक जूने हे मंदिर आहे. दररोज इथे भाविकांची मांदियाळी असते. आषाढी एकादशीला तर इथे भाविकांचा मेळा जमतो. पाय ठेवायलाही या परिसरात जागा नसते, एवढी गर्दी इथे असते. पाहूया याच प्रतिपंढरपूर संदर्भातील एक रिपोर्ट.
रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर; भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आहे साक्षीदार - Ashadhi wari
भारताचा स्वातंत्र्यलढा या मंदिराने अनुभवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेकांच्या भाषणांनी हे मंदिरही पावन झाले आहे.
रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणारे हे विठ्ठल मंदिर 1718 मध्ये शंकरदास गोपाळदास गुजर यांनी बांधले. त्यानंतर 1820 साली शंकरदास गुजर यांचे नातू भिकूदास लक्ष्मणदास गुजर यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर 1926 साली पुन्हा एकदा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या मंदिरात गेल्या तीनशे वर्षांपासून आषाढी एकादशीच्या उत्सवाची परंपरा सुरू आहे.
भारताचा स्वातंत्र्यलढा या मंदिराने अनुभवला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेकांच्या भाषणांनी हे मंदिरही पावन झाले आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरानीच मंदिर बहुजनांसाठी खुले करण्याचा कार्यक्रम याच मंदिरातून केला होता. आषाढ महिना म्हटले, की कोकणात शेतीच्या कामांना वेग आलेला असतो. त्यातच एवढ्या लांब विठुरायाच्या दर्शनाला जाणे अनेकांना शक्य नसते. त्यामुळे अनेक वारकरी, ग्रामस्थ या प्रतिपंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या भेटीला येतात. तसे वर्षाचे 365 दिवस हे मंदिर भविकानी गजबजलेलं असते.