रत्नागिरी - ढोल-ताशांच्या गजरात कोकणात मंगळवारी शिमगोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी होळी लागली. या उत्सवासाठी हजारो चाकरमाने कोकणात दाखल झाले आहेत. या होळीला कोकणात तेरसेचे होम असे म्हटले जाते. रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये जवळपास 5 गावांमध्ये तेरसेचे होम आज पेटवण्यात आले.
कोकणात शिमगोत्सवाचा जल्लोष ; अनेक ठिकाणी पेटले 'तेरसेचे होम' - shimga
गावातील होळीच्या मैदानात रात्री सुके गवत आणि झाडांच्या सुक्या फांद्या घेऊन पहाटेपर्यंत होम तयार केला जातो आणि सकाळी लवकर हे होम गावातील गुरव आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून पेटवण्यात येतो.
गावातील होळीच्या मैदानात रात्री सुके गवत आणि झाडांच्या सुक्या फांद्या घेऊन पहाटेपर्यंत होम तयार केला जातो आणि सकाळी लवकर हे होम गावातील गुरव आणि मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करून पेटवण्यात येतो. होळी लागल्यानंतर नवविवाहित नवऱ्याने होळीत नारळ टाकण्याची परंपरा आहे. त्यानंतर ढोल आणि ताश्यांच्या तालावर देवीची पालखी नाचवली जाते. मंगळवारपासून पुढील १५ दिवस देवीची पालखी गावातील प्रत्येक घरी जाते. कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा असलेला या शिमग्याच्या उत्सवासाठी लाखो चाकरमनी गावी दाखल झाले आहेत.