निर्बंधांविरोधात रत्नागिरीतील व्यवसायिकांचे भीक मांगो आंदोलन - ratnagiri
दुकान बंद करून दुकानासमोरच भीक मांगो आंदोलन करत नव्या निर्बंधांचा व्यावसायिकांनी निषेध केला.
रत्नागिरी : कोरोनाच्या सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधांविरोधात रत्नागिरीत व्यावसायिकांनी आंदोलन केले. दुकान बंद करून दुकानासमोरच भीक मांगो आंदोलन करत नव्या निर्बंधांचा व्यावसायिकांनी निषेध केला.
निर्बंधांना विरोध
सरकारने लागू केलेल्या नव्या निर्बंधांना व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. नवे नियम हे पूर्णपणे हास्यास्पद असून, हे बंद तर ते चालू असे करून कोरोनाचे संक्रमण कसे रोखणार? असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये नोकरांचे पगार, बँकांचे कर्ज भरताना आधीच व्यावसायिक उध्वस्त झालेला असताना शासनाने ही नवी नियमावली जाहीर केली आहे. सरकारने या नव्या नियमांचा पुनर्विचार केला तर प्रत्येक व्यवसायिकावर भीक मागण्याची वेळ येईल असे यावेळी व्यावसायिक कांचन मालगुंडकर म्हणाले.