महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भास्कर जाधवांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या - अमोल मिटकरी - उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भास्कर जाधवांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले होते. त्याचा प्रश्नांचा धागा पकडून अमोल मिटकरींनी शिवसेनेसह भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले.

अमोल मिटकरी

By

Published : Sep 21, 2019, 3:55 PM IST

रत्नागिरी - जे प्रश्न भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना तुम्हाला विचारले होते. त्याची आधी उत्तरे द्या, असे म्हणत राष्ट्रवादीच्या अमोल मेटकरी यांनी शिवसेनेसह भास्कर जाधवांवर जोरदार टोलेबाजी केली. चिपळूणमध्ये आयोजित शिवास्वराज्य यात्रेदरम्यान ते बोलत होते.

अमोल मिटकरींचे भाषण

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भास्कर जाधव हे शिवसेना-भाजपवर टिकेचं आसूड ओढायचे. ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीबाबत बोलताना भास्कर जाधव यांनी एकदा उद्धव ठाकरेंना काही सवाल केले होते. हाच धागा पकडून मिटकरी यांनी शिवसेनेसह भास्कर जाधव यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

हेही वाचा -मूर्तिजापूर मतदारसंघ: भाजपचे आमदार पिंपळे हॅट्रिकच्या तयारीत; विरोधकांचे कडवे आव्हान

उद्धव ठाकरे यांचा एकही व्यवसाय नसताना, त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कुठून? त्यांच्याकडे एकही कारखाना नाही, शिक्षणसंस्था नाही, त्यांच्याकडे कुठलीही पतसंस्था नाही. उद्धव ठाकरे साहेबांना फोटोग्राफीचा छंद आहे, मात्र त्यांचा कुठेही स्टुडिओ नाही, मग पैसा येतो कुठून? हे माझे प्रश्न नाहीत, भास्कर जाधवांचे प्रश्न आहेत. आणि तेच भास्करराव जाधव पवार साहेबांशी फारकत घेऊन शिवबंधन बांधायला जातात. पक्ष सोडून गेलेल्यांचे काय हाल आहेत, ते किरीट सोमय्याला विचारा असे म्हणत मिटकरींनी भास्कर जाधवांना टोला लगावला आहे.

हेही वाचा -MAHA VIDHAN SABHA : द्विभाषिक राज्याची पहिली निवडणूक आणि महाराष्ट्राचा ‘मंगल कलश’

ABOUT THE AUTHOR

...view details