रत्नागिरी- चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे पुराच्या पाण्यात शिवशाही बस अडकली होती. पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर शिवशाही बसही सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.
चिपळूणमध्ये पुराच्या पाण्यात शिवशाही बस अडकली; प्रवासी सुखरूप - शिवशाही
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथे पुराच्या पाण्यात शिवशाही बस अडकली होती. पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर शिवशाही बसही सुरक्षित स्थळी हलविण्यात आली.
पुणे येथून चिपळूणकडे शिवशाही बस येत होती. मात्र, मुसळधार पावसामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने ही बस खेर्डी येथील सखल भागात पुराच्या पाण्यात अडकली. जवळपास अडीच ते तीन फूट पाण्यात ही बस अडकली. या बसमध्ये २० ते २२ प्रवासी होते. बस पुराच्या पाण्यात अडकल्याने प्रवाशी घाबरले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान दाखवत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलवले. त्यानंतर ही बसही पाण्यातून बाहेर काढून खेर्डी ग्रामपंचायतीत आणण्यात आली.