महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ता न मिळाल्यामुळे भाजप सैरभैर - खासदार विनायक राऊत - शिवसेना खासदार विनायक राऊत ऑन भाजप

सत्तेसाठी हपापलेल्यांना असं वाटत होतं की, आज उद्या या खुर्चीवर आपण चिकटून बसू, पण त्यांच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सुदैवाने तसं घडले नाही आणि महाविकास आघाडीचं भक्कम सरकार आलं, असं सांगत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

shivsena mp vinayak raut
शिवसेना खासदार विनायक राऊत

By

Published : Dec 2, 2020, 5:32 PM IST

रत्नागिरी - सत्तेसाठी हपापलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांची मंडळी सत्ता न मिळाल्यामुळे आता सैरभैर झाले आहेत. त्यामुळेच ते जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रेस घेवून महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत

सत्तेसाठी हपापलेल्यांचा भ्रमनिरास झाला - राऊत

याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, सत्तेसाठी हपापलेल्यांना असं वाटत होतं की, आज उद्या या खुर्चीवर आपण चिकटून बसू, पण त्यांच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सुदैवाने तसं घडले नाही आणि महाविकास आघाडीचं भक्कम सरकार आलं, असं सांगत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, दिल्लीतील भाजपचे मंत्री असोत व खासदार असोत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नेहमी कौतुकच करतात, आणि त्या सर्वांना माहिती आहे की, ज्या पद्धतीने सत्तेची हाव धरून देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवर स्वारी करण्याचा जो प्रयत्न चालवला होता, पण दिल्लीकर काही झुकले नाहीत त्यांना सर्व माहिती आहे, आणि अशा या सत्तापिपासू व्यक्तीला सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय दिल्ली चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही. नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही, हे त्यांना पटलं म्हणून फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचं काम त्यांनीच केलं असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा -युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत; शेअर बाजारात केले लखनऊ बाँडचे अनावरण

हेही वाचा -सेल्फीच्या मोहाने गमाविला जीव; गोदावरी नदीच्या पात्रात पडून नवविवाहितेचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details