महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकेला दोन आयुक्त नको - खासदार विनायक राऊत - बीएमसी लेटेस्ट न्यूज

मुंबईचं आजचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि चाललेलं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक आयुक्त हीच संकल्पना योग्य आहे, असं खा. विनायक राऊत यावेळी म्हणाले.

खासदार विनायक राऊत
खासदार विनायक राऊत

By

Published : Jan 11, 2021, 7:24 AM IST

Updated : Jan 11, 2021, 9:05 PM IST

रत्नागिरी-मुंबई महानगरपालिकेला दोन आयुक्त नकोत, अशी सष्ट भूमिका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी मांडली. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईला दोन आयुक्त असावेत, अशी मागणी केली होती. त्यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार विनायक राऊत


एक आयुक्त हीच संकल्पना योग्य आहे -
मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या सुस्थितीत चालला आहे. नियोजन सुद्धा चांगल्या पद्धतीने होत असताना मुंबईला दोन आयुक्त देणं हे योग्य होणार नाही. आयुक्त जरी एक असले तरी त्यांच्या हाताखाली अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त असे अनेक अधिकारी काम करत असतात. मुंबईचं आजचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि चाललेलं कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी एक आयुक्त हीच संकल्पना योग्य आहे, असेही राऊत म्हणाले.

Last Updated : Jan 11, 2021, 9:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details