रत्नागिरी - ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये, असा थेट इशारा खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना दिला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये - खा. विनायक राऊत - विनायक राऊत
ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये, असा थेट इधारा खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना दिला आहे. ते रत्नागिरीत बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले की, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हि आता गरज आहे. खूप पदे रिक्त आहेत. त्यामुळे असलेल्या थोड्या मंत्र्यांवर भार पडत असल्याने ते योग्य प्रकारे कामकाज करू शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणे हे क्रमप्राप्त आहे. आता ते करत असताना शिवसेनेचा विचार करून एखाद्याची वर्णी लागत असेल, तर हे शिवसेनेचे मोठेपण आहे. पण ज्यांना कोणाला मंत्री करत असतील त्यांनी शिवसेनेशी टक्कर देण्याची भाषा करू नये. यापूर्वीची शिवसेना त्यांनी अनुभवलेली आहे. आताची शिवसेनाही अनुभवलेली आहे. कोकण म्हणजे शिवसेना हे जे समीकरण आहे ते कायम आहे, ते कोणीही पुसण्याचे काम करू शकत नाही असे राऊत म्हणाले.
दरम्यान कोणावर गोळ्या झाडून, कोणाचे मुडदे पाडून जर तो रिफायनरी प्रकल्प करायचा असेल आणि त्यामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समाधान वाटत असेल तर त्यांनी नारायण राणे यांना मंत्री करावं, पण ज्याप्रमाणे नाणारची रिफायनरी हटविली त्याप्रमाणे जर बारसूच्या लोकांना जर हा प्रकल्प नको असेल आणि त्यांच्यावर जर प्रकल्प लादण्याचा प्रयत्न झाला तर कोणत्याही परिस्थितीत कोणीही येवो तेथून त्यांना हाकलंल जाईल, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिला.