रत्नागिरी : 'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख' , असे म्हणत शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना धमकी ( Shivsena MLA Rajan Salvi Threatened ) दिल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाबाबत ( Nanar Refinery Project ) विरोधी भूमिका घेतल्याने त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली ( Rajan Salvi Registered FIR ) आहे.
Shivsena MLA Threatened : 'तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे', म्हणत शिवसेनेच्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी - राजन साळवींनी गुन्हा दाखल केला \
रत्नागिरी येथील रिफायनरीच्या प्रकल्पाला ( Nanar Refinery Project ) विरोध करणाऱ्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली ( Shivsena MLA Rajan Salvi Threatened ) आहे. याबाबत साळवी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली ( Rajan Salvi Registered FIR ) आहे.
रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है
आमदार राजन साळवी यांना १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ९२६५४४०५७६ या क्रमांकावरुन पहिला फोन आला. अज्ञाताने 'रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख' एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर ११ जानेवारीला रात्री ११.१४ वाजता परत फोन करुन धमकी दिली. ‘रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे' अशी धमकी देण्यात आली. याबाबत आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात ( Ratnagiri City Police Station ) तक्रार दाखल केली आहे. शहर पोलिसांनी एनसी दाखल करून घेतली आहे. आमदार साळवी यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.