महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या एका आमदाराचा वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह

बुधवारी रात्री रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या अहवालात शिवसेनेच्या एका आमदाराचा वाहनचालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, लॉकडाऊन असल्याने गेल्या काही दिवसांपासून आमदार आणि वाहनचालकाचा संपर्क आलेला नाही.

Shivsena mla driver corona positive
शिवसेना आमदाराचा चालक कोरोना पॉझिटिव्ह

By

Published : May 28, 2020, 2:49 PM IST

रत्नागिरी-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. बुधवारी रात्री आलेल्या अहवालांमध्ये खेड तालुक्यातील जामगे येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हा व्यक्ती कांदिवलीहून जामगेमध्ये आला होता. विशेष म्हणजे हा व्यक्ती जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचा वाहनचालक म्हणून काम करत होता.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तो संबंधित आमदाराच्या गाडीवर वाहन चालवण्यासठी गेला नव्हता. त्यामुळे या शिवसेना आमदाराला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी कळंबणी येथील रुग्णालयामध्ये मुंबईवरुन आलेल्या या वाहनचालकाला दाखल करण्यात आले होते.

वाहनचालकामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे दिसल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा व्यक्ती शिवसेना आमदाराचा वाहनचालक असला, तरी गेल्या काही दिवसांत या दोघांचा संपर्क झाला नव्हता. त्यामुळे त्या लोकप्रतिनिधीला काेणताही धोका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details