रत्नागिरी - आमदार नितेश राणेंच्या पाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत आता शिवसेना सुद्धा आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. मुंबई - गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी ठेकेदारांच्या कामगारांना धारेवर धरले. खड्डे भरले नाहीत तर तुम्हालाच खड्ड्यात घालू असाही दम राजन साळवी यांनी ठेकेदाराला दिला.
...अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात घालू; शिवसेना आमदार राजन साळवींचा ठेकेदाराला इशारा - मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेना आक्रमक
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे जिकिरीचे बनले आहे. यावरूनच शिवसेना आक्रमक झाली. आमदार राजन साळवी यांनी आक्रमक होत ठेकेदारांच्या माणसांना महामार्गावरच धारेवर धरले.
![...अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात घालू; शिवसेना आमदार राजन साळवींचा ठेकेदाराला इशारा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3808978-thumbnail-3x2-ratnagairi.jpg)
मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र त्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालवणे जिकिरीचे बनले आहे. यावरूनच शिवसेना आक्रमक झाली. आमदार राजन साळवी यांनी आक्रमक होत ठेकेदारांच्या माणसांना महामार्गावरच धारेवर धरले. तसेच खड्ड्यांसदर्भात ठेकेदाराला फोन करुन झापले. एका तासात खड्डे बुजवण्याचे काम सुरु करा अन्यथा पुढच्या अनर्थाला तुम्हीच कारणीभूत रहाल असा सज्जड दम देखील आमदार साळवींनी ठेकेदाराला दिला.
खड्डे बुजवले नाहीत तर तुम्हाला सुद्धा या खड्ड्यात घालू असे सांगत आमदार राजन साळवींनी मुंबई - गोवा महामार्गाच्या ठेकेदारांच्या कामगारांना इशारा दिला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष राजू कुरूप यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.