रत्नागिरी- मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सायंकाळी रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरात सर्वत्र मोठमोठे बॅनर झळकत आहेत. यात विशेष म्हणजे शिवसेना उपनेते व म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले असून ते सध्या लक्ष्यवेधी ठरत आहे.
शिवसेना उपनेते उदय सामंत यांचे रत्नागिरीतील 'हे' बॅनर्स ठरत आहेत लक्षवेधी - my dear friend Banner Ratnagiri
बॅनरवर सामंत यांनी 'माझे परममित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रत्नागिरीत हार्दिक स्वागत' असा उल्लेख केलेला आहे. शहरात असे बॅनर्स सर्वच ठिकाणी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री सभा घेणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा असे बॅनर झळकलेत. त्यामुळे सध्या याच बॅनर्सची शहरात चर्चा रंगली आहे.
![शिवसेना उपनेते उदय सामंत यांचे रत्नागिरीतील 'हे' बॅनर्स ठरत आहेत लक्षवेधी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4466468-thumbnail-3x2-hu.jpg)
बॅनरवर सामंत यांनी 'माझे परममित्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रत्नागिरीत हार्दिक स्वागत' असा उल्लेख केलेला आहे. शहरात असे बॅनर्स सर्वच ठिकाणी पहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री सभा घेणार आहेत त्या ठिकाणी सुद्धा असे बॅनर झळकलेत. त्यामुळे सध्या याच बॅनर्सची शहरात चर्चा रंगली आहे. २०१४ मध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर उदय सामंत हे राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडूनही आले होते. सध्या ते म्हाडाचे अध्यक्ष आहेत.
सामंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संबंधही चांगले आहेत. सध्या जिल्ह्यात रत्नागिरी आणि गुहागर या दोन जागांसाठी स्थानिक भाजप आग्रही आहे. या दोन्ही जागांवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा केलेला आहे. आणि अशातच सामंत यांच्याकडून हे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे सध्या हे बॅनर लक्षवेधी ठरत आहे. याच बॅनरचा आढावा घेतला आहे आमचे ईटीव्ही प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी.