महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..तर खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही - उदय सामंत - minister uday samant latest news

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील काही वर्षांपासून पक्षावर नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखविली आहे. यामुळे त्यांनी भविष्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत काम करायला हरकत नाही, असे मत शिवसेना नेते उदय सामंत यांनी व्यक्त केले.

shivsena leader uday samant on bjp eaknath khadse
...तर खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही - उदय सामंत

By

Published : Sep 12, 2020, 8:59 PM IST

Updated : Sep 12, 2020, 9:35 PM IST

रत्नागिरी- भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर शिवसेनेकडून देण्यात आली आहे. 'खडसे साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यावर भाजपमध्ये जर अशी वेळ येत असेल तर ते दुर्दैवी आहे, शेवटी हा विषय त्यांच्या पक्षांतर्गत आहे, पण भविष्यात जर खडसे साहेब वेगळा विचार करणार असतील तर त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही' असे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी म्हटले आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

..तर खडसेंनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही - उदय सामंत

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी वारंवार उघडपणे व्यक्त केलेली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी काही आरोप केले आहेत. दरम्यान, शिवसेनेने खडसे यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. याबाबत बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपचा समाचार घेतला.

भाजपमध्ये सुरू झालेले युद्ध शीत युद्ध राहिलेलं नाही, ते मैदानात आता जाहिर युद्ध सुरु झाले आहे. खडसे साहेबांचे काम मी स्वतः गेली 15 ते 20 वर्ष जवळून पाहिलेले आहे. भाजपमधील आशा ज्येष्ठ नेत्यावर ही वेळ येत असेल तर ते दुर्देवी आहे. त्यामुळे खडसे साहेब भविष्यात जर काही वेगळा विचार करणार असतील, तर त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचा विचार करायला हरकत नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी खडसे यांना शिवसेनेत येण्याची ऑफरच दिली आहे.

ज्यांच्यामुळे भाजपची राज्यात सत्ता आली, त्या खडसेंवर ही वेळ येणं ही दुर्देवी आहे. पण खडसे साहेबांनी ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांनी आत्मचिंतन करण्याची वेळ असल्याचा उपरोधीक टोलाही सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी लगावला. दरम्यान, भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौफ्यस्फोट उदय सामंत यांनी यावेळी केला. पण त्यांची नावे उघड करण्याची ही वेळ नसल्याचंही सामंत यावेळी म्हणाले.

Last Updated : Sep 12, 2020, 9:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details