महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"मनसेच्या मोर्चाचे रूपांतर मतांमध्ये किती होणार ?" - mns mahamorcha raj thackeray

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलेली नसल्याचे मत शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी मांडले आहे.

uday samant
उदय सामंत

By

Published : Feb 9, 2020, 8:34 PM IST

रत्नागिरी -मनसेच्या मोर्चावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मनसेला टोला लगावला आहे. मोर्चाचे रूपांतर मतांमध्ये किती होईल, हे महत्त्वाचे आहे, असे म्हणत सामंतांनी मनसेच्या महामोर्चावर आपली प्रतिक्रिया दिली.

"मनसेच्या मोर्चाचे रूपांतर मतांमध्ये किती होणार"

हेही वाचा -'जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल'

मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलेली नाही. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापूर्वी देखील मोर्चे निघाले त्याचे काय झाले हे माहिती असल्याचे मंत्री सामंत म्हणाले. त्यामुळे या मोर्चाचे रूपांतर मतांमध्ये किती होणार हा प्रश्न आहे.

हेही वाचा -लहानपणापासून कमळ बघायचे संस्कार नाहीत

ABOUT THE AUTHOR

...view details