रत्नागिरी -महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. रामदास कदम यांच्यावर करण्यात आलेल्या या बोचऱ्या टीकेला त्यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम यांच्यावर बोलण्याची निलेश राणेंची लायकी नाही. कोकणी माणूस हा संस्कारांसाठी ओळखला जातो. मात्र, निलेश राणे यांच्यावर संस्कार झाले असते, तर त्यांनी अशी टीका केली नसती. त्यामुळे निलेश राणे यांनी त्यांची लायकी ओळखून बोलावे, असा प्रतिहल्ला रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
'रामदास कदम यांच्यावर बोलण्याची निलेश राणेंची लायकी नाही' - शिवसेना नेते रामदास कदम
महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली होती. त्याला रामदास कदम यांचे सुपुत्र आमदार योगेश कदम यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, राणे आता कणकवली मतदार संघापुरतेच मर्यादित राहिले असल्याने केवळ प्रसिद्धीसाठी निलेश राणे अशी टीका करतात. राणे काँग्रेसच्या काळात सलग दहा वर्ष सत्तेत होते. मात्र, त्यांनी कोकणासाठी काय केले? असा सवाल आमदार योगेश कदम यांनी उपस्थित केला. 'गेल्या पाच वर्षात रामदास कदम यांनी 300 कोटींहून अधिक निधी कोकणात आणला. राखडलेले प्रकल्प मार्गी लावले. रामदास कदम यांना पक्षाने आजपर्यंत भरभरून दिले आहे. त्यामुळे नाराज असण्याचा प्रश्न नाही. शिवसेना पक्ष हा आदेशावर चालतो आणि आम्ही आदेशाचे पालन करतो,' असेही ते म्हणाले.