महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवसेना म्हणजे धगधगते अग्नीकुंड, नादाला लागाल तर संपून जाल'

शिवसेना म्हणजे एक धगधगते अग्नीकुंड आहे. ज्यांनी आतापर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा केली तेच संपून गेले आहेत. असा घणाघात शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि राज्य सचिव प्रमोद जठार यांच्यावर केला आहे.

shivsena leader rajendra mahadik
राजेंद्र महाडीक

By

Published : Sep 22, 2020, 4:39 PM IST

रत्नागिरी - शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कांसाठी निर्माण केलेले एक अस्त्र आहे. शिवसेना म्हणजे एक धगधगते अग्नीकुंड आहे. ज्यांनी आतापर्यंत शिवसेना संपवण्याची भाषा केली तेच संपून गेले आहेत. त्यामुळे भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि राज्य सचिव प्रमोद जठार यांनी शिवसेना संपवण्याची भाषा करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे. शिवसेनेच्या नादाला लागाल तर तुम्हीच संपून जाल, असे चोख प्रत्युत्तर शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि राज्य सचिव प्रमोद जठार यांना दिले आहे.

भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी शिवसेना संपेल. शिवसेना सत्तेतून उतरेल, त्याच्या दुसर्‍या दिवशी नाणार रिफायनरीची अधिसूचना काढली जाईल, असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी खरपूस समाचार घेतला. महाडिक म्हणाले, की कोकणात अनेक समस्या असताना प्रमोद जठारांना फक्त रिफायनरीच दिसते आणि ही रिफायनरी केव्हाच रद्द झालेली आहे. त्यामुळे रिफायनरीचे स्वप्न प्रमोद जठारांनी पाहू नये आणि शिवसेना सत्ततून उतरेल या भ्रमात राहू नये. शिवसेनेवर टीका करण्याआधी प्रमोद जठार यांनी आपण शिवसेनेमुळेच युतीचा आमदार म्हणून निवडून आला होतात. त्यानंतर मात्र तुम्हाला पराभव स्वीकारावा लागला याची जाणीव त्यांनी ठेवावी. शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपून गेले आहेत हे इतिहास सांगतो. त्यामुळे शिवसेनेच्या नादाला तुम्ही लागाल तर तुम्हीच संपून जाल. शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे असे चोख उत्तर महाडिक यांनी दिले.

पुढे महाडीक यांनी जठारांना आणखी एक आठवण करुन दिली आहे. 2014 ते 2019मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होता. केंद्रात तर तुमचेच सरकार आहे, मग तुम्ही रिफायनरीची एक वीटपण का लावू शकला नाहीत. शिवसेना आणि ग्रामस्थांमुळेच हा रिफायनरी प्रकल्प रद्द करावा लागला होता. त्या दिवसापासून प्रमोद जठार हे रिफायनरीची स्वप्ने पाहात असल्याची टीका महाडिक यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details